ठाणे : ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील नागरिकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून त्यावर दरमहा पाच टक्के व्याज देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे १२५ जणांची दोन कोटी १३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली असून फसवणूक झालेल्या नागरिकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चेतन चंड (४२) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१४ मध्ये डोंबिवली येथे त्याने देसर इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी स्थापन केली. फेसबुक तसेच विविध समाजमाध्यमांतून त्याने नागरिकांना संपर्क करण्यास सुरुवात केली. ही कंपनी शेअर बाजारात गुंतवणूक करते. कंपनीत गुंतवणूक केल्यास गुंतविलेल्या रकमेवर दरमहा पाच टक्के व्याज मिळेल, असे त्याने नागरिकांना सांगितले. चेतनच्या आमिषाला बळी पडून ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरातील अनेक नागरिकांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला चेतनने काही गुंतवणूकदारांना परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढत होती. मात्र, २०१९ नंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले. त्यामुळे १२५ गुंतवणूकदारांनी याप्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रारअर्ज केला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चेतन चंड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?