डोंबिवली : खदानीत पडलेल्या आई आणि बहिणीला वाचविण्यासाठी गेलेली मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना येथील कोळे गावात उघडकीस आली. अग्निशमन दलाचे जवान या बेपत्ता मुलीचा शोध घेत आहेत.

कोळे गावातील गीता आपल्या लावण्या (१६) आणि परी (४) या दोन मुलींसह दुपारी कपडे धुण्यासाठी गावाजवळील दगडाच्या खदानीत गेल्या होत्या. गीता आणि लावण्या कपडे धूत असताना परी खदानीच्या काठावर खेळत होती. खेळताना तिचा तोल जाऊन पाण्यात पडली. ती बुडू लागताच गीताने पाण्यात उडी मारली. दोघीही बुडू लागल्याने लावण्याने खदानीत उडी मारली. गीता आणि परीने एकमेकींचा आधाराने काठ गाठला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात लावण्या मात्र स्वत: बुडाली.