News Flash

ठाण्यात १७ घाऊक भाजी बाजार

जांभळी नाका येथील भाजी मंडई अखेर बंद

जांभळी नाका येथील भाजी मंडई अखेर बंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भाजीपाल्याची दुकाने खुली ठेवण्यात परवानगी देण्यात आली असली तरी, जांभळी नाका येथील भाजी बाजार बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही मंडई बंद होणार असल्याने शहरातील किरकोळ विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी १७ ठिकाणी घाऊक भाजी बाजार सुरू करण्यात येणार आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानंतरही जांभळी नाका भाजी बाजारात स्वस्त भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्य़ातील सर्वच भाजीपाला दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारपासून पुन्हा भाजीची दुकाने उघडण्यात आली. मात्र, जांभळी नाका येथील भाजी मंडईत पुन्हा गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ही मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या ९ प्रभागांमध्ये एकूण १७ ठिकाणी घाऊक बाजार सुरू करण्यात येत आहे. या घाऊक बाजारात परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन भाजीपाला खरेदी करता येणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही बाजारात जाता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घाऊक व्यापारी, त्यांचे कामगार आणि किरकोळ विक्रेत्यांनी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी इतर नागरिकांना भाजीपाला विक्री केल्यास व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना परवानगी देण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

 

घाऊक बाजार कुठे?

प्रभाग समिती ठिकाणे

उथळसर साकेत पोलीस मैदान, अनिल जाधव मैदान, वृंदावन शेवटचा बसथांबा.

मुंब्रा बाहुबली मैदान, जैन मंदिर मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर, मित्तल मैदान.

दिवा दिवा महोत्सव मैदान, दिवा आगासन रोड, छत्रपती क्रीडा मैदान, बीसयूपी जवळ, पडले गाव.

वागळे रामनगर पाण्याच्या टाकीजवळील मैदान, साईनाथ मंदिर मैदान.

माजीवडा खेळाचे मैदान आरक्षण क्रमांक चार, ज्ञानगंगा महाविद्यालयाजवळ, बोरीवडे आनंदनगर परिसर घोडबंदर, वाघबीळ टीजेएसबी बँकेसमोरील मैदान, कावेसर कॉसमॉस पार्कसमोर.

नौपाडा-कोपरी भगवती शाळा मैदान शाहू मार्केटजवळ

वर्तकनगर उन्नती मैदान, देवदयानगर रोड शिवाईनगर, निहारिया मैदान, घाणेकर नाटय़गृहाजवळ

लोकमान्य नगर सचिन तेंडुलकर मैदान, महात्मा फुलेनगर, सावरकर नगर शाळा क्र. १२० मैदान.

कळवा  पारसिक रेतीबंदर मैदान, ९० फूट रस्ता खारेगाव, पारसिक नगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 3:19 am

Web Title: 17 wholesale vegetable market in thane zws 70
Next Stories
1 समुदाय स्वयंपाकगृहाच्या उद्घाटनात सामाजिक अंतराची ऐशीतैशी
2 किरकोळ बाजारात दुप्पट दर
3 पालिकेच्या संकेतस्थळावरही भाजीसाठी गर्दी
Just Now!
X