10 July 2020

News Flash

अभिनत्रीवर शेरेबाजीप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकरणी नयानगर पोलिसांनी विलंबाने तक्रार दाखल करून घेतल्याचा आरोप तिने केला आहे

वसई : मीरारोड येथे राहणाऱ्या प्रसिद्ध लावणी कलाकार व मराठी अभिनेत्रीच्या फेसबुक पोस्टवर अपशब्द आणि अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठी चित्रपटाच्या लावणीचे शूटिंग करत असतानाचा सहकलाकारासोबतचा काढलेला फोटो फेसबुकवर टाकला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर सरूप पांडा नावाच्या अनोळखी व्यक्तीने अपशब्दांचा वापर करून फोटोवर अश्लील शेरेबाजी केली होती.

या प्रकरणी नयानगर पोलिसांनी विलंबाने तक्रार दाखल करून घेतल्याचा आरोप तिने केला आहे. दरम्यान, पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक पथक ओडिशाच्या दिशेने पाठवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:05 am

Web Title: actress filed case against lewd comments on facebook zws 70
Next Stories
1 ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा बक्षीस सोहळा उत्साहात
2 पालिकेचा कारभार आयुक्ताविना
3 मुंबईतील प्रतिसाद पाहून ठाण्यात रात्रजीवन
Just Now!
X