02 March 2021

News Flash

आर्थींगच्या तारेत अडकलं म्हशीचं शिंग

९० फुटी रस्त्यावर ही घटना घडली.

विरारमध्ये इलेक्ट्रिक पोलच्या आर्थींग तारेमध्ये एका म्हशींचे शिंग अडकले होते. पूर्वेकडील ९० फुटी रस्त्यावर ही घटना घडली. आज दुपारी रस्त्यावर सोडलेल्या मोकाट जनावारांपैकी एक म्हैस ९० फुटी रस्त्यावरील देशमुख फार्म बाहेर असलेल्या आर्थींग केबलला शिंग घासत होती याच वेळी तिचे एक शिंग आर्थींग तारेच्या गॅपमध्ये अडकले.

रस्त्यावरून चालणाऱ्या वाटसरूंनी हा प्रकार बघितला व वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाला याबाबतची माहिती दिली.

घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर म्हशींची सुटका करण्यात यश आले. हा सर्व प्रकार बघण्यासाठी रस्त्याच्याकडेला बघ्यांची खूप गर्दी झाली होती. शिंग तारेतून निघताच म्हैशीनेही सुटकेचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 4:56 pm

Web Title: buffalow stuck in wire virar dmp 82
Next Stories
1 पाणीबिलाने पालिकेला घाम!
2 ठाण्यात दोन दिवस पाणी नाही
3 ठाण्यात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X