जागा हस्तांतराचा प्रस्ताव पुन्हा तहकूब

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी शीळ भागातील महापालिकेची जागा देऊन त्याचा आर्थिक स्वरूपात मोबदला घेण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेसह राष्टवादीकडून स्थगित ठेवण्यात येत असतानाच, या दोन्ही पक्षांनी शुRवारच्या सभेत पुन्हा हा प्रसताव स्थगित ठेवला.

मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्टीय हायस्पीड रेल कॉपोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) च्या माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाची प्रRिया सुरू आहे. या प्रकल्पास मात्र विरोध होत आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींचा मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील शीळ, डावले, पडले, माथार्डी, देसाई, आगासन आणि बेतावडे या गावामधील प्रकल्पात बाधित होणाऱ्या जमिनींकरिता प्रति हेक्टर ९ कोटी रुपये मोबदला दर निश्चित करण्यात आला आहे. शीळ भागात ३८४९ चौरस मीटर क्षेत्रफळ इतकी जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा भूखंड विकास आराखडय़ात रस्त्याचा भाग आहे. या जागेतून बुलेट ट्रेन जाणार असल्याने ही जागा देण्याची मागणी ‘एनएचएसआरसीएल’ने केली असून त्यासाठी ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्याची तयारी दाखविली होती. या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. परंतु या प्रस्तावास शिवसेना आणि राष्ट्रवादीने विरोध करत स्थगित ठेवला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागा हस्तांतरणाची प्रRिया रखडली होती. असे असतानाच शुRवारच्या सभेत पुन्हा हा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पुन्हा चर्चेविनाच हा प्रस्ताव स्थगित ठेवला. या प्रस्तावासाठी भाजप आग्रह धरेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु ऑनलाइनऐवजी सभागृहात सभा होत नसल्यामुळे आंदोलन करत सभेवर आधीच बहिष्कार टाकला. त्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने सभेचे कामकाज सुरू ठेवत हा प्रस्ताव स्थगित केला.

प्रस्तावात काय?

या भागातून विकास आराखडय़ातील  ४० मीटर रस्ता असून त्यावर कल्याण रोड ते एमआयडीसी रोड उड्डाणपुलाचे बांधकाम एमएमआरडीएकडून प्रस्तावित आहे. परंतु या पुलाच्या बांधकामास एनएचएसआरसीएलनी यापूर्वीच एमएमआरडीएला अनुमती दिली आहे. तसेच हा भुखंड एनएचएसआरसीएला हस्तांतरीत करण्यास हरकत नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ही जागा एनएचएसआरसीएला हस्तांतरीत करून त्याचा आर्थिक मोबदला घेण्यास मान्यता द्यावी, असे महापालिकेने प्रस्तावात म्हटले होते.