व्होडाफोनचे कर्मचारी असल्याचे सांगून कल्याण पूर्वेकडील आमदार गणपत गायकवाड यांना एका तोतयाने एक लाख ७० हजार रुपयांना गंडा घातला. अति महत्त्वाचा मोबाइल क्रमांक मिळवून देतो, असे त्याने गायकवाड यांना सांगितले. सनी सूर्यवंशी असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
गायकवाड यांच्या तिसाई येथील कार्यालयात शनिवारी दुपारी सनी याने व्होडाफोन कंपनीतर्फे महत्त्वाचा मोबाइल क्रमांक देतो, असे सांगून त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार त्यांनी दहा टक्के रक्कम रोख व उर्वरित रकमेचा धनादेश त्याला दिला; परंतु नंतर सनी याच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिसांत तक्रार दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2015 रोजी प्रकाशित
आमदार गायकवाड यांची फसवणूक
अति महत्त्वाचा मोबाइल क्रमांक मिळवून देतो, असे त्याने गायकवाड यांना सांगितले.
Written by रत्नाकर पवार
First published on: 14-09-2015 at 07:57 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with mla