काँग्रेसच्या करयकर्त्यांवर गुन्हा
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार घडू लागले आहेत. पैशांचे वाटप होत असल्याच्या संशयावरुन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली. पूर्वेतील पाथर्ली – त्रिमुर्तीनगरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असून कॉंग्रेसच्या ८ ते १० कार्यकत्यार्ंवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्ली गावठाण या प्रभागातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी शांताराम बनसोडे हे मुंबईतील पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांसह डोंबिवलीत आले आहेत. मंगळवारी रात्री प्रचार संपल्यानंतर ते परतत असताना सात ते आठ जणांनी त्यांना तुम्ही कोण आहात, कोठून आले आहात असे प्रश्न विचारले. शिवसेना कार्यकर्त्यांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यामुळे संतापलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना कार्यालयात आणून शटर आतून बंद करुन घेतले. त्यानंतर तुम्ही पैसे वाटप करण्यासाठी आलात असा आरोप करुन बनसोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी महादेव भगत, कपिल हिंगोले, दशरथ म्हात्रे यांच्यासह अन्य कॉंग्रेसच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
पैसे वाटपाच्या संशयावरून शिवसेना कार्यकर्त्यांना मारहाण
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 29-10-2015 at 00:45 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubt to give bribe causes of riots