News Flash

कचरा विकेंद्रीकरणाचा निर्णय खड्डय़ांपुरताच

प्रकल्पाच्या आरक्षित आठपैकी केवळ दोन जागांवर खोदकाम

प्रकल्पाच्या आरक्षित आठपैकी केवळ दोन जागांवर खोदकाम

भाईंदर : उत्तनमधील ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर शहरातील आठ आरक्षित जागांवर  कचरा विकेंद्रीकरणाचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, वर्षभरापासून हा प्रकल्प कागदावरच असल्याचे उघड झाले आहे. केवळ दोन ठिकाणी दाखविण्यासाठी खड्डे खणण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उत्तन येथील धावगी डोंगरावर पालिकेचा घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया पार पडत नसल्याने स्थानिकांना दुर्गंधी सोसावी लागत आहे. यावर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या घनकचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याच वेळी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातील विविध भागातील आठ आरक्षित जागांवर कचरा विकेंद्रीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या आरक्षित जागांवर कमीतकमी दोन आणि जास्तीत जास्त १० टन कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारले जाणार होते. हे प्रकल्प बंदिस्त स्वरूपाचे अआहेत. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर ‘बायो-मिथेनायजेशन पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. यातून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूच्या मदतीने वीजनिर्मिती करण्यात येणार होती. प्रकल्प बंदिस्त असल्याने  दुर्गंधीची समस्या उद्भवणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता.

याशिवाय मोठय़ा गृहसंकुलांना कचरा विकेंद्रीकरणाचा प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही पालिकेचा  प्रकल्प कागदावरच असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उत्तन येथील कचरा प्रRिया ठप्प झाली असून स्थानिकाना  प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे काशिमीरा येथील भूखंडावर  खड्डे खणून दिशाभूल करण्याचा प्रय प्रशासन करत असल्याचे आरोप उत्तन ग्रामस्थांनी केले आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.  प्रकल्पाचे काम अद्याप सुरू करण्यात झालेले नाही. त्यामुळे कचरा दुर्गंधीचा त्रास उत्तनच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

-शर्मिला बगाजी, शिवसेना नगरसेविका

प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, करोनाकाळात ते रखडले. येत्या काही दिवसांत प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात येईल.

दीपक खांबित, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:13 am

Web Title: garbage decentralization project at eight reserved places in mira bhayandar city is on paper zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरच्या २१ इमारती धोकादायक
2 भाईंदरची परिवहन सेवा ठप्प
3 करोनाकाळात रेल्वे अपघातात घट
Just Now!
X