News Flash

दुबेच्या साथीदारांना विमानाने नेणार

रस्ते मार्गाने अपघाताच्या कारणावरून आरोपींचा न्यायालयात अर्ज

संग्रहित छायाचित्र

गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी आणि सुशीलकुमार तिवारी या दोघांना १६ जुलैपर्यंत ट्रान्झिट रिमांड ठाणे न्यायालयाने सोमवारी मंजूर केला. उत्तर प्रदेश पोलीस या दोघांचा ताबा मिळविण्यासाठी ठाणे न्यायालयात आले होते. रस्ते मार्गाने उत्तर प्रदेशला जाताना वाहनाचा अपघात होण्याची भीती असल्याने आम्हाला विमानाने न्यावे, असा अर्ज आरोपींनी केला होता. या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी दिली.

ठाणे ते कानपूर हे अंतर फार मोठे आहे. तसेच पावसाळा सुरू असल्याने रस्तेही निसरडे झालेले आहेत. त्यामुळे पोलिसांसोबत जाताना अपघात होऊ शकतो. असा अर्ज न्यायालयात केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: goons will take dubeys accomplices by plane abn 97
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील आणखी एका शहरात लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवला
2 विरोधी पक्ष केवळ टीका करण्यात दंग – आदित्य
3 ठाणेकरांच्या व्यायामावरही पालिकेचे निर्बंध
Just Now!
X