आपल्या गृहवाटिकेतील झाडं छान वाढत असताना आपल्याला जशी ती आवडतात तशीच अनेक किडे, कीटक व बुरशी यांना पण ती आवडतात आणि त्यांचा मुक्काम आपल्याच गृहवाटिकेत होतो. अर्थात अशावेळी या सर्वापासून झाडाचं संरक्षण आपल्याला करावं लागतं. योग्य माती, ऊन आणि पाणी यामुळे झाडे सुदृढ असतात, पण जर रोगाचा मारा झाल्यामुळे झाडाची प्रकृती बिघडली तर आपल्याला लक्ष द्यावं लागतं.

अनेक वेळा झाडाच्या पानांवर काळे, तपकिरी ठिपके दिसतात, फांदीवर ढेकणासारखे पांढरे किडे किंवा तपकिरी गोल किडे दिसतात. कढिलिंब, गुलाब या झाडांवर छोटय़ा अळ्या दिसतात. मात्र कधी कधी झाडाचं निरीक्षण करूनसुद्धा किडे, अळ्या दिसत नाहीत, मात्र नवीन आलेली फूट वाळून जाते किंवा एकाएकी झाडाची पानं मलूल होतात. अशा वेळी झाडाला बुरशीपासून त्रास होत असतो. ही बुरशी बऱ्याचवेळा मुळांना लागलेली असते. हा विषय खूप मोठा आहे.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल

झाडांवरील रोगनिवारणासाठी बाजारात इन्सेक्टिसाइड, हर्बीसाइड, फंगीसाइड मिळतात. या सर्वाना मिळूनच पेस्टीसाइड म्हटलं जातं आणि ही विषारी असतात. गृहवाटिकेसाठी हे विषारी पदार्थ टाळून आपण नैसर्गिकरीत्या उपाय करू शकतो.

खाली दिलेल्या उपायांपैकी शक्य असेल तो करावा. हे सर्वसाधारण उपाय आहेत. मात्र यांचा गृहवाटिकेला नक्कीच फायदा होतो.

१) कडुनिंबाचा पाला किंवा निंबोण्या (कडुनिंबाची फळे) पाण्यात उकळवून पाणी गार करून झाडावर शिंपडावे, तसेच झाडाच्या मुळाशी सर्व बाजूंनी थोडे घालावे. (शहरात फुलवाल्यांकडे किंवा भाजीमार्केटमध्ये कडुिनबाचा पाला सहज उपलब्ध असतो. कारण पॅकिंगसाठी याचा वापर होतो.

२) साबणाचे पाणी झाडावर शिंपडावे. यासाठी अर्धा चमचा श्ॉम्पू अथवा लिक्विडसोप १ लिटर पाण्यात मिसळून ते वापरावे. ऊन असताना हा उपाय करू नये. साबणाचे पाणी शिंपडल्यावर १-२ तासाने साधे पाणी शिंपडावे.

३) लाकडाची राख किंवा उदबत्तीची राख छोटे किडे/ अळ्या असतील तिथे टाकावी. राख घालण्यापूर्वी झाडावर पाणी शिंपडून ते ओले करावे. यामुळे राख चिकटून बसेल आणि उडून जाणार नाही. डासांसाठी वापरायच्या कॉइलची राख घेऊ नये. त्यातील रसायनांमुळे पाने करपतात.

४) जास्वंदीवरील पांढऱ्या किडय़ांसाठी उत्तम उपाय म्हणजे, लसणीच्या ८-१० पाकळ्या सोलून ठेचाव्या आणि त्या बुडतील इतक्या रॉकेलमध्ये किंवा तेलात त्या ठेवाव्या. १०-१२ तास पाकळ्या भिजल्यावर हे मिश्रण कापडात ठेवून पिळून घ्यावे आणि त्यात २० पट पाणी मिसळावे. याची फवारणी करावी किंवा झाडावर शिंपडावे.

५) काही वेळा मुंग्यांचा त्रास होतो. लाल मुंग्या कुंडीतील माती पोखरतात. इतर मुंग्यांचा त्रास नसतो. लाल मुंग्यांवर उपाय म्हणजे फरशी पुसण्यासाठी वापरायच्या फिनेलचे ३-४ थेंब एका तांब्याभर पाण्यात टाकून ते पाणी मुंग्या असलेल्या कुंडीत सर्व बाजूंनी घालावे.

* वरील उपायात मापे मुद्दामच काटेकोर न देता, घरगुती दिली आहेत. ज्यामुळे ते अमलात आणायला सोपे जाईल.

* झाडावर पाणी शिंपडताना, पानांच्या खालच्या बाजूला औषध लागणे अपेक्षित आहे. कारण कीड सहसा पानाच्या खालच्या बाजूला असते. त्यामुळे फांदी तिरकी करून पाणी शिंपडावे.

* किडीमुळे पानं, फांदी खूपच खराब झाल्यास लगेच तेवढा भाग कापावा म्हणजे ती इतर ठिकाणी पसरणार नाही.

स्वत:च्या आरोग्याबरोबरच गृहवाटिका असल्यावर झाडांच्या तब्येतीचीदेखील काळजी घेणे भाग आहे!

drnandini.bondale@gmail.com