मुलांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. सुट्टीच्या काळात मुलांनी सतत संगणक, भ्रमणध्वनीवरील खेळांकडे आकृष्ट न होता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल अशा उपक्रमांचे आयोजन ठाण्यातील विविध ग्रंथालयांनी केली आहे. बालवाचकांसाठी ग्रंथालयाची वेगळी दालने सुरू झाली असून मुले या दालनांमध्ये येऊन आपल्या आवडीची पुस्तके वाचू शकतात.  शहरातील ग्रंथालयाच्या बाल विभागाचा हा वेध..

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (नौपाडा केंद्र)

  • ग्रंथालयात स्वतंत्र बालविभाग अस्तित्वात आहे.
  • बाल विभागात १९०० पुस्तकांचा संग्रह आहे.
  • २४ एप्रिलपासून बालवाचकांसाठी मोफत पुस्तके ठेवण्यात आली असून १५ जूनपर्यंत बालवाचकांना ही पुस्तके मोफत वाचता येणार आहेत.
  • वेळ – सकाळी ८ ते रात्री ८

कल्याण सार्वजनिक ग्रंथालय, कल्याण</strong>

विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या सभागृहात बालसाहित्य मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. लहान मुलांसाठी गोष्टीच्या दोनशे पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरू असणार आहे.

  • मोफत बालसाहित्य वाचनाची वेळ – सकाळी ८ ते दुपारी १

पुस्तकांची मेजवानी – फ्रेन्ड्स ग्रंथालय, डोंबिवली

फ्रेन्ड्स ग्रंथालयाचे कर्मचारी शाळांना सुट्टी सुरू होण्याआधी विविध शाळांमध्ये भेट देऊन ग्रंथालयाचे कूपन्स विद्यार्थ्यांना देतात.  या ग्रंथालयाचा बाल विभागात मराठी भाषेतील सात हजार पुस्तके आणि इंग्रजीतील ११५३४ पुस्तकांचा संग्रह आहे.

  • वाचनाची वेळ – सकाळी ७.३० ते १.३० दुपारी ४.३० ते ९.३०

टिटवाळा सार्वजनिक वाचनालय, टिटवाळा

टिटवाळा सार्वजनिक ग्रंथालयातील बालसाहित्य १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लहान मुलांसाठी मोफत वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  • वाचनाची वेळ – सकाळी ९.३० ते १ दुपारी ५.३० ते ९.००