21 September 2018

News Flash

‘लेडीज स्पेशल’चे सारथ्य महिलांकडे

जागतिक महिला दिनानिमित्त शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले.

मध्य रेल्वेतर्फे महिलादिनी विशेष उपक्रम

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 19959 MRP ₹ 26000 -23%
  • ARYA Z4 SSP5, 8 GB (Gold)
    ₹ 3799 MRP ₹ 5699 -33%
    ₹380 Cashback

जागतिक महिला दिनानिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे महिलांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. महिला कर्मचारी काम करत असलेल्या काही विशेष गाडय़ा महिला दिनानिमित्त चालविण्यात आल्या. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकामधून ८ वाजून १ मिनिटाने सुटणाऱ्या महिला विशेष गाडीमध्ये महिला मोटरमन आणि गार्ड यांच्यासह गाडीमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालवण्यात आली.

जागतिक महिला दिनानिमित्त शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. रेल्वे प्रशासनातर्फे महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष गाडय़ा चालवण्यात आल्या. त्यामध्ये पुणे-बारामती, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडय़ा तर कल्याण रेल्वे स्थानकावरून ८ वाजून १ मिनिटाने सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महिला विशेष गाडीचा समावेश होता. दर वर्षी महिलांसाठी खास चालविल्या जाणाऱ्या महिला विशेष गाडीमध्ये महिला दिन साजरा केला जातो. रेल्वे प्रशासनातर्फे रंगीबेरंगी फुले आणि फुग्यांनी गाडीची सजावट करण्यात आली होती. महिला दिनानिमित्त पहिली महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या या गाडीची धुरा सांभाळली. या गाडीमधून महिला तिकीट तपासक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी प्रवास केला. रेल्वे स्थानकातील प्रवासी संघटनांनी या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. महिला प्रवासी आणि संघटनांकडून कार्यक्रमासाठी उपस्थित रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, स्थानक प्रबंधक आणि स्थानक निर्देशक यांच्याकडे महिलाचा दररोजचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी वेगवेगळ्या सुविधांची मागणी करण्यात आली.

First Published on March 9, 2018 3:15 am

Web Title: ladies special train on central railway womens day 2018