‘लोकसत्ता अर्थभान’मधून मार्गदर्शन; रविवारी कल्याणमध्ये अर्थसाक्षरता उपक्रम

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

ठाणे : विक्रमी टप्प्यानजीकचा भांडवली बाजार, वाढत्या गंगाजळीचा म्युच्युअल फंड उद्योग, सावरत्या दराचा सराफा बाजार, स्थिर किमतीतील गृहनिर्माण क्षेत्र अशी अर्थस्थिती असताना जोखीमरहित व आकर्षक परतावा देणारी गुंतवणूक कोणती याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’ गुंतवणूक उपक्रमात होणार आहे. कल्याण येथे येत्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. यानिमित्ताने उपस्थितांसाठी गुंतवणूकविषयक शंकांच्या निरसनाची संधी आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकपर उपक्रमाच्या नव्या पर्वातील तिसरे सत्र आता ठाणे जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आले असून त्याचा पहिला टप्पा कल्याण येथे पार पडेल. रविवार, १५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. तसेच यासाठी काही जागा निमंत्रितांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहेत.

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सध्या त्यांच्या विक्रमानजीक प्रवास करत आहेत. तसेच ऐन सण-समारंभातही तुलनेत मौल्यवान धातूंच्या दरात स्वस्ताई आहे. देशातील फंड प्रकारातील गुंतवणुकीचा ओघ सातत्याने वाढत आहे आणि स्थावर मालमत्तेच्या किमतीही स्थिर आहेत. असे विविध पर्याय असताना निर्धोक गुंतवणुकीसाठी सद्य:स्थितीत कोणता मार्ग निवडावा, याबाबत या कार्यक्रमात उपस्थित गुंतवणूकदारांना मार्गदर्शन होईल.

आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या ‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ या विषयाद्वारे एकूणच फंड क्षेत्राचा आढावा घेताना फंडांचे प्रकार, त्यातील गुंतवणूक व परतावा यांचा आढावा घेतील. फंडांची वैशिष्टय़े आदींवरही त्या प्रकाश टाकतील. तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे ‘अर्थनियोजन महत्त्वाचे’ या विषयाशी निगडित बाबींवर भाष्य करतील. वयाच्या विविध टप्प्यांतील गुंतवणूक, आर्थिक नियोजन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी हेही ते सांगतील.

कधी?

  • रविवार, १५ डिसेंबर २०१९
  • सायंकाळी ६ वाजता

कुठे?

  • सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम)
  • मार्गदर्शक व विषय
  • तृप्ती राणे – म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ
  • कौस्तुभ जोशी – अर्थनियोजन महत्त्वाचे