02 March 2021

News Flash

वरळीच्या कल्याणी यांना दुहेरी गृहलाभ!

घर आणि दुबई सफर अशा बक्षिसांसोबत आकर्षक बक्षिसे भाग्यवान विजेत्यांना मिळाली.

केसरीचे प्रमोद दळवी यांच्या हस्ते विजेते महेश गवंडळकर यांना दुबई सफर हे पारितोषिक देण्यात आले.

‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात

आयुष्यभर जोपासलेले स्वप्न घरखरेदीच्या माध्यमातून पूर्ण करत असतानाच या घरासोबत दुसरे घर मोफत मिळण्याच्या दुहेरी स्वप्नपूर्तीचा अनुभव वरळीतील कल्याणी बनसोडे यांना आला आहे. ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्या गृहखरेदीदारांमध्ये बनसोडे या भाग्यवान ठरल्या. तुलसी इस्टेट प्रस्तुत ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी रात्री ठाण्यातील द ग्रील हाऊस हॉटेलच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात तुलसी इस्टेटचे भाविन पटेल, क्विंजल पटेल आणि संदीप पटेल यांच्या हस्ते बनसोडे कुटुंबीयांना पारितोषिक देण्यात आले. तसेच महेश गवंडळकर यांनी ‘दुबईची सफर’ हे दुसरे पारितोषिक पटकावले. केसरीचे प्रमोद दळवी यांच्या हस्ते गवंडळकर कुटुंबीयांना हे पारितोषिक देण्यात आले.

दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक कुटुंब मोठय़ा आशेने नवीन घराचे स्वप्न पाहात असते. आर्थिक व्यवहार सांभाळत एखाद्या ठिकाणी घराची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या घरावर आणखी घर मोफत मिळाल्यास हा आनंद सर्वोच्च असतो. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ या उपक्रमाच्या माध्यमातून ही संधी वाचकांना मिळत असते. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘वास्तुरंग वास्तुलाभ’ या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तुलसी इस्टेट, सहप्रायोजक पुनित ग्रुप, प्लॅटिनम पार्टनर विजय ग्रुप, गोल्ड पार्टनर थार्वानी, सिल्वर पार्टनर लब्धी लाइफस्टाईल लिमिटेड, पॉवर्ड बाय ठाणेकर ग्रुप, हाऊसिंग लोन पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ट्रॅव्हल पार्टनर केसरी आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर द ग्रिल हाऊस यांचे सहकार्य लाभले आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या भाग्यवान विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.  वास्तुरंग वास्तुलाभ उपक्रमासाठी सहकार्य करणारी अनेक मान्यवर मंडळी या समारंभात उपस्थित होती. तुलसी ग्रुपचे भाविन पटेल यांनी लोकसत्ताच्या उपक्रमाचे कौतुक करत अलीकडे कोणतीही वस्तू मोफत मिळते यावर विश्वास नसतो. मात्र लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ उपक्रमाच्या माध्यमातून विश्वासार्हता जपली जाते, असे सांगितले. तसेच या उपक्रमामुळे ग्राहकांचा विश्वास मिळाला असल्याची प्रतिक्रिया पुनित ग्रुपचे प्रतीक पाटील यांनी दिली.

घर आणि दुबई सफर अशा बक्षिसांसोबत आकर्षक बक्षिसे भाग्यवान विजेत्यांना मिळाली. विजय ग्रुप येथे घर खरेदी करणाऱ्या मधुरा गायकवाड यांना एलईडी टीव्ही, थर्वानी रियाल्टीकडून घर खरेदी केलेल्या प्रतीक्षा भावर्ते यांना वातानुकूलित यंत्र, थर्वानी इन्फ्रास्ट्रक्चर येथे घर खरेदी केलेल्या संजय शहरकर यांनासुद्धा वातानुकूलित यंत्र, फोरवे रियाल्टी येथे घर खरेदी करणारे किरण काळे आणि वृषाली काळे यांना एलईडी टीव्ही, श्रीसाई डेव्हलपर्स येथे घराची नोंदणी केलेल्या जयेश भाटवळे यांना एलईडी टीव्ही, तुलसी इस्टेटमध्ये घर खरेदी केलेल्या धनंजय फडके यांना एलईडी टीव्ही, पुनित डेव्हलपर्समध्ये घर खरेदी केलेल्या प्रदीप कुमार यांना एलईडी टीव्ही अशी आकर्षक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. उत्तरा मोने यांनी उत्स्फूर्त शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया

घर खरेदी करण्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. घर कसे असावे याचे खूप आधीपासून नियोजन केले होते. त्यानुसार घर खरेदी केले. घर खरेदी केल्यावर आणखी एक घर मोफत मिळेल, याची कल्पना नव्हती. प्रत्यक्षात पारितोषिक स्वीकारताना खूप आनंद होत आहे. लोकसत्ताचे मन:पूर्वक आभार.

– कल्याणी बनसोडे, घर विजेत्या

घर खरेदी केल्यावर एखाद्या ठिकाणी कुटुंबीयांसोबत सहलीला जायचे ठरवले होते. अशा वेळी दुबईची परदेश सफर पारितोषिक स्वरूपात मिळणे हे भाग्य आहे. लोकसत्ताचा वास्तुरंग वास्तुलाभ उपक्रम लोकांना प्रोत्साहन देणारा आहे.

– महेश गवंडळकर, दुबई सफर विजेते

लोकसत्ता नियमित वाचतो. पारितोषिक मिळाले आहे असा फोन आल्यावर सुरुवातीला विश्वास बसला नाही. इतर बक्षिसांप्रमाणे खोटा फोन आला असेल असे वाटले. मात्र लोकसत्ताच्या विश्वासामुळे पारितोषिक घेण्यासाठी आलो आणि पारितोषिक मिळाले, लोकसत्ताचे आभार.

– संजय शहरकर, वातानुकूलित यंत्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 1:09 am

Web Title: loksatta vasturang vastulabh contest 2017 loksatta vastulabh contest winners 2017 loksatta vastu labh contest
Next Stories
1 चिमण्यांसाठी ठाणेकरांचा चिऊकाऊचा घास
2 ‘अर्धवटरावां’ची शंभरी जल्लोषात
3 शहरबात- कल्याण : पार्किंगअभावी नागरिकांची कोंडी
Just Now!
X