News Flash

गौरीच्या सणात महालक्ष्मीचे पूजन

आपल्याकडे गणेशोत्सवात साधारण तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते.

‘इंदुरी’ प्रथेचे ठाण्यात यंदा ६०वे वर्ष

आपल्याकडे गणपतीत ‘गौरी’ आणि नवरात्रोत्सवात ‘महालक्ष्मी’ अवतारातल्या आदिशक्तीचे पूजन करण्याची प्रथा आहे. मध्य प्रदेशमध्ये मात्र गणपती उत्सवात महालक्ष्मींचे पूजन केले जाते. ज्येष्ठ आणि कनिष्ठ म्हणजेच थोरल्या आणि धाकटय़ा जाऊबाईंच्या रूपातल्या या देवींचे पूजन मूळचे इंदूरकर असलेल्या ठाण्यातील चित्तरंजन कजवाडकर यांच्या घरात दरवर्षी केले जाते. यंदा त्यांच्या घरी साजऱ्या होणाऱ्या या वैशिष्टय़पूर्ण प्रथेचे साठावे वर्ष आहे.

आपल्याकडे गणेशोत्सवात साधारण तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी मुक्काम करून तिसऱ्या दिवशी गणपतीबरोबरच गौरींचे विसर्जन होते. मध्य प्रदेशात मात्र गौरींच्या जागी महालक्ष्मीच्या रूपातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ भावजयांचे पूजन केले जाते. केजवाडकर कुटुंबीयांनी गेली साठ वर्षे ही प्रथा सुरू ठेवली आहे. यंदाही ठाण्यातील त्यांच्या पवारनगरमधील घरी ज्येष्ठ आणि कनिष्ठ महालक्ष्मी देवतांचे आगमन झाले आहे. या देवींचे मुखवटे पितळी असून ते कायमस्वरूपी आहेत. या देवीच्या आगमनाप्रीत्यर्थ सोळा भाज्या, सोळा चटण्या, पुरणपोळी आदी जिन्नसांचा समावेश असलेला महाप्रसाद केला जातो. विशेष म्हणजे या ज्येष्ठ आणि कनिष्ठ देवतांचे आगमन होण्यापूर्वी गणपतीचे विसर्जन केले जाते.

आमच्या घरी आजोबांनी ही प्रथा सुरू केली. माझ्या आईने ती परंपरा पुढे सुरू ठेवली. यानिमित्ताने आम्ही कुटुंबीय वर्षांतून एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने साजरा करतो. गणेशोत्सवातील हे महालक्ष्मीपूजन उत्सुकतेने पाहण्यासाठी कजवाडकर कुटुंबीयांच्या घरी परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने येतात. योगायोगाने ज्येष्ठ-कनिष्ठ महालक्ष्मींचे आगमन आणि आमची आई कुसुम हिचा ८५ वा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने यंदा दुग्धशर्करा योग असतो.

-चित्तरंजन कजवाडकर, ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:09 am

Web Title: mahalaxmi puja begins today bringing more cheers
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने घडविले..
2 सृजनाची फॅक्टरी : मोठा अर्थ सांगणारी छोटी गोष्ट
3 रुग्णालय की जंगल?
Just Now!
X