भाईंदर : उत्तनमध्ये पित्यानेच आपल्याच नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीची आई कारखान्यात नोकरी करत असून आरोपी वडील मजूर आहे. काही दिवसांपूर्वी मुलीची आई नातेवाईंकाकडे गेली होती. या काळात आरोपीने मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. उत्तन पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडिलांना अटक केली असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2020 रोजी प्रकाशित
मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
पीडित मुलीची आई कारखान्यात नोकरी करत असून आरोपी वडील मजूर आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 01-09-2020 at 03:45 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for molesting minor daughter zws