मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन आज १६४ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्त ठाणे रेल्वे प्रवाशी संघटनांनी एकत्र येऊन ठाणे रेल्वेचा प्रतिकात्मक ५ किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला. ‘आशिया खंडातून साहेबांची पोरं लय भारी, बिना बैल घोड्याची हकलली गाडी’ अशी घोषणा करत १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे सेवा सुरु झाली होती.

चाकरमान्यांची लाइफलाइन असलेल्या रेल्वेचा आज १६४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशी संघटनांनी रेल्वेचा प्रतिकात्मक केक कापून जल्लोष केला. देशात १६ एप्रिल १८५३ साली मुंबई बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वे सेवा सुरु होऊन १६४ वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून ज्या सेवा उपलब्ध व्हायला हव्यात त्या सुविधा मिळत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.
दि. १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे सुरु झाली आणि त्या गाडीचं स्वागत करण्यात आलं. याचा १६४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रवाशी संघटनांतर्फे हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या चिंचोळी पायलट, रेल्वे कर्मचारी संजय गुप्ता, गँगमन, स्टेशन मास्तर सुरेंद्र महिंदर, स्टेशन मास्तर लक्ष्मण दास यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ठाणे शहरामध्ये बारामती, जोनपूर, दिल्ली प्रमाणे रेल्वेचे एक इंजिन बसवावे, अशी मागणी ३ ते ४ वर्षांपासून करत असल्याची माहिती प्रवाशी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.