येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अकरावी उत्तीर्ण झाल्यावर वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ झालेल्या शाळूसोबत्यांची तब्बल ५३ वर्षांनंतर नुकतीच लोणावळा येथे पुनर्भेट झाली. १९६३ मध्ये जुनी अकरावी उत्तीर्ण झालेले हे सर्व विद्यार्थी आता आपापल्या नोकरी-व्यवसायातून निवृत्त झाले आहेत. आपल्यापेक्षा कितीतरी तरुण विद्यार्थी शाळासोबती जमवून बाकावरील दिवसांना उजाळा देत असताना आपणही असा प्रयोग का करू नये असा विचार या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या मनात आला. शाळेनंतर कुणीही फारसे एकमेकांना भेटले नसल्याने जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा सहकुटुंब भेटण्याचे या शाळासोबत्यांनी ठरविले आहे व इतरही सोबत्यांना आवाहन केले आहे. संपर्क-  ९३२३५०१४८०.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…