पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रस्ताव सादर; गोवा पोलिसांच्या धर्तीवर निर्णय
पर्यटनासाठी समृद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी गोवा पोलिसांच्या धर्तीवर पर्यटन पोलीस तयार करण्याचा गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघरसह वसई-विरारमधील पर्यटनाच्या विकासासाठी या पर्यटन पोलिसांचा मोठा फायदा होणार आहे.
सध्या शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस अशी पोलिसांची विभागणी आहे. त्यात सायबर पोलीस, सागरी पोलीस अशी नवीन पोलीस ठाणी स्थापन होत आहेत. या पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागते. राज्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असते. स्थानिक पोलिसांकडे असलेले अपुरे पोलीस बळ, साधनसामग्रीचा अभाव आणि कामाची व्यस्तता यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र वेळ देता येत नाही. त्यामुळे मुंबईसह कोकण, औरंगाबाद, नागपूर येथे पर्यटन पोलीस पथक (टुरिझम पोलीस) स्थापन करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. गोव्याच्या धर्तीवर पर्यटन पोलीस तयार करण्याचा मानस आहे. त्या पोलिसांना खास प्रशिक्षण दिले जाणार असून साधनसामग्री पुरवली जाणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रभात यांनी हा प्रस्ताव सादर केलेला आहे.

पालघर जिल्ह्याला फायदा
या निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा पालघर जिल्ह्याला होणार आहे. पालघर जिल्हा हा विविध निर्सगसंपन्नतेने नटलेला आहे. वसई-विरारमध्ये पुरातन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, पोर्तुगीजकालीन चर्चेस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध स्तूप, पिकनिक स्थळे आदी आहेत. तेथे अनेक पर्यटक येत असतात. पर्यटन पोलीस स्थापन झाल्यास त्यांना सोयीसुविधा आणि बंदोबस्त देणे शक्य होणार आहे. दहशतवादी संघटना नेहमीच पर्यटकांवर हल्ला करण्याचे लक्ष्य बाळगून असतात. त्यामुळे या पर्यटन पोलिसांमुळे पर्यटकांना सुरक्षाकवच मिळू शकेल. इंग्रजी बोलणारे, संभाषणकौशल्य असणाऱ्या पोलिसांचा त्यात समावेश आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

पर्यटन पोलीस ही एक उत्तम संकल्पना आहे. या पोलिसांचा गणवेशही आकर्षक असतो आणि ते पर्यटन विकास महामंडळाशी संलग्न असतात. पर्यटन पोलीस ही संकल्पना परदेशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षेची हमी मिळते आणि त्यांना आधार मिळतो.
– श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

पर्यटन पोलिसांचा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. तो निर्णय संमत होईल तेव्हा त्याची अंमलबजावणी होईल.
– प्रशांत बुरडे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक.