News Flash

कळव्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

विकास सुभाष कनोजिया असे आरोपीचे नाव असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

कळव्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार
छायाचित्र प्रातिनिधीक

कळवा येथील भास्करनगर परिसरात एका १९ वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ही तरुणी घरामध्ये एकटी असताना हा प्रकार घडला असून, या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विकास सुभाष कनोजिया असे आरोपीचे नाव असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. कळव्यातील भास्करनगर परिसरात पीडित १९ वर्षीय युवती राहात असून, याच परिसरात विकास राहतो. गुरुवारी दुपारी ही तरुणी घरात एकटीच होती. त्याचाच गैरफायदा घेत विकास तिच्या घरामध्ये शिरला. त्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2017 2:19 am

Web Title: raped on 19 years old girl in kalwa
Next Stories
1 बेकायदा झोपडय़ांसाठी शिंदे-आव्हाडांची युती
2 अतिरिक्त भिंतीमुळे येऊरच्या जंगलात ‘प्रवेशबंदी’?
3 शिवसेनेचे ‘सुधारणा’कार्ड
Just Now!
X