‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’च्या लढय़ाला यश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इयत्ता सातवीच्या इतिहास विषयातील छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या धडय़ात अखेर त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. मात्र पाठय़पुस्तकातील धडय़ात त्यांच्या या जन्मतारखेचा उल्लेख नव्हता. ‘सह्य़ाद्री प्रतिष्ठान’ ही संस्था गेली चार वर्षे ही त्रुटी दूर होण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येताना पुढील शैक्षणिक वर्षांपासून सातवीच्या पुस्तकाच्या नव्या सुधारित आवृत्तीत संभाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji maharaj birth date mentioned in 7th standard book
First published on: 08-03-2017 at 01:16 IST