20 July 2019

News Flash

शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

रवी पाटील यांच्यावर मंगळवारी रात्री सहा ते सात जणांनी हल्ला केला.

प्रतिनिधिक छायाचित्र

शहापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रवी पाटील असे कार्यकर्त्याचे नाव आहे. या हल्ल्यात रवी पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.

रवी पाटील यांच्यावर मंगळवारी रात्री सहा ते सात जणांनी हल्ला केला. लोखंडी रॉडने मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात रवी पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First Published on April 17, 2019 7:25 am

Web Title: shahapur attack on ncp party worker case registered against unknown person