News Flash

शिवाई वक्तृत्व स्पर्धेचे डोंबिवलीत आयोजन

दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

शिवाई बालक मंदिर ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सीमा ठोसर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवाई वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धक निवडले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाप्रमाणे ही स्पर्धा होणार आहे.
जून १९९८ ते मे २००० या कालावधीत जन्मलेल्या मुले, मुलींना गट क्रमांक १ मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. जून १९९५ ते मे १९९८ या कालावधीतील मुले, मुलींना गट क्रमांक २ मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धा प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर आहे. अंतिम फेरीतील १० स्पर्धकांची नावे २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एमआयडीसीतील शिवाई बालक मंदिर शाळेत जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांनी दिली. प्रवेश अर्ज २० नोव्हेंबपर्यंत आदित्य सभागृह, आगरकर रस्ता, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ५ ते रात्रो ८ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. संपर्क : यशवंत भुस्कुटे- ९८१९१४७६४७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:03 am

Web Title: shivai oratory competition in dombivali
Next Stories
1 पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने भिवंडीत दोघांची हत्या
2 वसईत स्थलांतरित, प्रवासी पक्ष्यांची संख्या जास्त
3 धरणाच्या पाण्यात छटपूजा!
Just Now!
X