‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ

‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला शुक्रवारी ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली. या खरेदी उत्सवात ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील शंभरहून अधिक गृहोपयोगी वस्तूंचे शो रुम्स सहभागी झाले आहेत. महोत्सवात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भाग्यवान सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. २३ दिवसांच्या या महोत्सवात खरेदी करणाऱ्याना दररोज बक्षिसांची लयलूट करता येणार आहेत.

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, अंकुर ज्वेलर्स कडून चांदीचे नाणे, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स, रेमंड, शगून, कलानिधी आणि ओंकार किचन्स यांच्याकडून आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. प्रत्येक आठवडय़ांच्या पारितोषिकांमध्ये एलईडी टीव्ही,फ्रिज, वॉटर प्युरीफायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, पैठणी साडी हे पारितोषिक मिळतील. महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे एका भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या ग्राहकाला केसरी टुर्सकडून दोन व्यक्तींसाठी सहलीचे पॅकेज यांसारखी बक्षिसे म्हणून दिली जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वीच्या सुट्टय़ांच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महोत्सवाने मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. वीकएण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून यूनियन बँक आणि प्रशांत कॉर्नर असोसिएट हे या महोत्सवाचे पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे झेना डिझाईन हे प्लॅटिनम पार्टनर, केसरी टूर्स हे ट्रॅव्हल पार्टनर, दी रेमण्ड शॉप हे वॉर्डरोब पार्टनर तर गिफ्ट पार्टनर कलानिधी, स्कायलार्क इलेक्ट्रॉनिक्स आणि ओंकार किचन वल्र्ड हे आहेत.

कसे सहभागी व्हाल?’ ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांचा लाभ मिळू शकेल.

  • या दुकानांमध्ये २५० रूपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.
  • अर्धवट माहिती भरलेली कूपन ग्राह्य़ धरली जाणार नाहीत.
  • दररोज ड्रॉप बॉक्समधून कूपन संकलित करून ‘ठाणे लोकसत्ता’ कार्यालयात आणण्यात येणार आहेत. त्यातून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्यांच्ांी निवड केली जाईल.
  • प्रत्येक भाग्यवान विजेत्याचे नावे ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध केली जातील.
  • ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवातील सर्व योजनांना अटी-शर्ती लागू आहेत.
  • या महोत्सवात सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अतुल जोशी- ९८२१४७५९१९ यांच्याशी संपर्क साधावा.