एचआयव्हीग्रस्तांना मोफत प्रवासाची सुविधा; परिवहन उपक्रमाचा निर्णय

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरांत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासोबतच वैद्यकीय तपासणीसाठी जाताना प्रवास करणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांना टीएमटीच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच एचआयव्हीग्रस्तांना दिलासा मिळणार असला तरी, पालिकेच्या तिजोरीवर पाच कोटी ४० लाखांचा बोजा पडणार आहे.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
west bengal governor cv ananda bose
अन्वयार्थ : राज्यपालांना ‘अपवादात्मक’ सल्ला
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी बससुविधा देण्यास असमर्थ ठरत आलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) कायापालट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत टीएमटीच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे टीएमटीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा ठरत आहे. यातच आता ज्येष्ठ नागरिक आणि एचआयव्हीबाधितांना सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळासह मुंबईतील बेस्ट आणि नवी मुंबईतील एनएमएमटी उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना प्रवासभाडय़ात निम्मी सवलत देण्यात येते. याच धर्तीवर टीएमटीच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे परिवहन उपक्रमाने वर्षांकाठी पाच कोटी १० लाख ३२ हजार ११० रुपये इतका तोटा अपेक्षित धरला आहे. ही तुट महापालिकेकडून अनुदान स्वरूपात परिवहन उपक्रमाला दिली जाणार आहे. त्यामुळे या खर्चाचा बोजा महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच एचआयव्हीबाधित रुग्णांना टीएमटी बसभाडय़ात सवलत दिली जाणार आहे. या सवलतीबाबत मुंबई येथील महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीने महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले होते. या रुग्णांना वेळोवेळी विविध कारणांमुळे संसर्ग होत असल्याने त्यांना केंद्रांवर तपासणीसाठी जावे लागते. बहुतेक रुग्ण आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असल्याने त्यांना प्रवास खर्च परवडत नाही. त्यामुळे त्यांना बसभाडय़ात सवलत देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्राच्या आधारे परिवहन प्रशासनाने अशा रुग्णांना बसभाडय़ात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीसाठी संबंधित रुग्णांना तपासणी केंद्राने दिलेली पुस्तिका दाखवावी लागणार आहे. या सवलतीमुळे परिवहनावर वर्षांकाठी ३० लाख ८४ हजार ६०० रुपये इतका बोजा पडणार आहे.