28 September 2020

News Flash

रॉकेल प्यायलाने एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुण्याला राहणाऱ्या भाग्यश्री सोनावने या दिवाळीनिमित्त मुलासह माहेरी आल्या होत्या. भाग्यश्री यांना एक वर्षाचा मुलाचा असून कार्तिक असे त्याचे नाव आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

दिवाळीनिमित्त मामाच्या घरी आलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचा रॉकेल प्यायलाने मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. कार्तिक सोनावने असे या चिमुरड्याचे नाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.

पुण्याला राहणाऱ्या भाग्यश्री सोनावने या दिवाळीनिमित्त मुलासह माहेरी आल्या होत्या. भाग्यश्री यांना एक वर्षाचा मुलाचा असून कार्तिक असे त्याचे नाव आहे. रविवारी घरात खेळत असताना कार्तिक रॉकेल प्यायला. जमिनीवर रॉकेल सांडले होते. हे रॉकेल कार्तिक पाणी समजून प्यायल्याचे सांगितले जाते. रॉकेल प्यायलाने काही वेळातच कार्तिकची प्रकृती खालावली होती. मात्र, रविवार असल्याने शहरातील अनेक रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. शेवटी जियास या रुग्णालयात त्याला नेण्यात आले. उपचारानंतर कार्तिकची प्रकृती सुधारली होती. मात्र, सोमवारी सकाळी कार्तिकची प्रकृती पुन्हा खालावल्याने डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णवाहिकेतून जात असतानाच कार्तिकचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कार्तिकचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर पोटात जास्त प्रमाणात रॉकेल गेल्यानेच कार्तिकचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 9:28 am

Web Title: toddler dies after drinking kerosene in ambernath
Next Stories
1 घोडबंदर पलीकडे ‘नवे ठाणे’ उभारण्याचा प्रस्ताव
2 महिला सुरक्षारक्षकावर चाकूहल्ला
3 दीड हजार वाहनांसाठी तळ!
Just Now!
X