16 February 2019

News Flash

आदिवासींचा विक्रमगड तहसीलवर मोर्चा

अनेक वेळा तहसीलदारांना निवेदन देऊनदेखील रोजगार हमीची कामे सुरू केली नाहीत.

(संग्रहित छायाचित्र)

 

दावेदारांना वनपट्टे कधी मिळणार

विक्रमगड तालुक्यामध्ये आजही वनहक्क दावेदारांना वनपट्टे मिळालेले नाहीत, महावितरण भोंगळ कारभार सुरू आहे, यासह इतर मागण्यांकरिता श्रमजीवी संघटनेने शेकडो आदिवासींच्या उपस्थितीत विक्रमगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठय़ा प्रमाणात आदिवासी महिला सहभागी झाल्या होत्या.

अनेक वेळा तहसीलदारांना निवेदन देऊनदेखील रोजगार हमीची कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात आदिवासी बांधवांना वणवण भटकावे

लागत आहे. दुसरीकडे महावितरणकडे वीज मीटर मागूनदेखील दिले जात नाहीत. त्यामुळे गावपाडय़ांवरील घरे आजही अंधारात आहेत. शासनाला वारंवार निवेदन देऊ नदेखील वनहक्क दावेदारांना वनपट्टे दिले जात नाहीत या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी श्रमजीवी संघटनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदन दिले व लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

First Published on September 6, 2018 2:41 am

Web Title: vikramgad tehsilwar morcha of tribal tribal people