आधारवाडी तुरुंगातील २० कैद्यांना करोना

कैद्याची करोना चाचणी करण्यासाठी तुरुंगात दोन खोल्या राखीव आहेत.

Corona Virus

कल्याण : कल्याणमधील आधारवाडी कारागृहातील २० कैद्यांना करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. खबरदारी आणि अधिक उपचारांसाठी त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्याने दिली. या कैद्यांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. कोणताही कैदी गंभीर नाही, असे सूत्राने सांगितले. विविध गुन्ह्यांत सहभागी असलेले हे कैदी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आदेशाने आधारवाडी तुरुंगात अलीकडे पाठविले होते. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कैद्याची करोना चाचणी करण्यासाठी तुरुंगात दोन खोल्या राखीव आहेत. तेथे न्यायालयाच्या आदेशाने दाखल होणाऱ्या कैद्याची चाचणी केली जाते. मगच त्या कैद्याला तुरुंगातील कोठडीत पाठविले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 20 prisoners in adharwadi jail test positive for covid 19 zws

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या