वसईतील मिठागर परिसरात जवळपास ४०० कुटुंब अडकली असल्याची माहिती समोर येत आहे. तर, अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या टीम रवाना झाल्या आहेत. खडवली येथून हेलिकॉप्टरद्वारे अनेक जणांना वाचवण्यात यश आले आहे.  भिवंडीतील अनेक भागांमध्येही पाणी साचल्याने येथील नागरिकांना देखील दुसरीकडे हलवले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास, भातसा आणि बारवी नदयांना पूर आला असून या नद्यांच्या आसपासच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे खडवलीजवळ भातसा नदीला आलेल्या पुरात एकूण ३५ नागरिक अकडकल्याची माहिती आहे. या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने भारतीय वायु दलास करण्यात आलेल्या मागणीनंतर वायुसेनेचे एमआय-१७ हॅलिकॉप्टर सांताक्रुझ येथून ठाण्यातील कांदिवली जवळील जू ननदखुरी गावात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रवाना झाले आहे.

तर वसईत पुराचा एक बळी गेला असून मोरी गावात १४ वर्षांचा पावन प्रजापती नावाचा मुलगा वाहून गेला आहे. शोधकार्य सुरू असून वसई पश्चिमपट्टितील कामण, साराजामोरी, मोरी, नागले या गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.