अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

बस उलटताच विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. ही बस इनरव्हिल शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. मात्र ही शाळेने नेमलेली बस नसून खासगी पद्धतीने ती चालवली जात होती अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

Story img Loader