कल्याण डोंबिवली पालिकेत जंतुनाशक फवारणीचे कंत्राट मिळविण्यासाठी सनदी लेखापालाचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन बनावट मार्गाने कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक सनदी लेखापाल या प्रकरणात तक्रारदार आहे.

पोलिसांनी सांगितले, कल्याण डोंबिवली पालिकेत जंतुनाशक फवारणीचे कंत्राट निघाले आहे. हे काम मिळविण्यासाठी महेंद्र सानप, रोहिदास भेरले या इसमांनी कार्यरत असलेल्या एका सनदी लेखापालाचे प्रमाणपत्र मिळवून ते निविदा प्रक्रियेत ऑनलाईन जोडले. या प्रमाणपत्रावर सनदी लेखापालाचा बनावट शिक्का, स्वाक्षरी होती. पालिकेच्या निविदा प्रक्रिया छाननी प्रक्रियेच्यावेळी प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. या कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. मूळ सनदी लेखापालाला याविषयी विचारण्यात आले. त्याने आपण जंतूनाशक फवारणी विषयीचे कंत्राट घेण्यासाठी कोणालाही खर्च ताळेबंदाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. किंवा आपण स्वता याविषयी काही प्रयत्न केले नाहीत.

या प्रकारानंतर महेंद्र, रोहिदास यांनी पालिकेची दिशाभूल आणि मूळ सनदी लेखापालाची फसवणूक करुन बनावट कागदपत्र तयार केली. बनावट मार्गाने पालिकेचे कंत्राट घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लेखापालाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत जंतुनाशक फवारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी चार्टड अकाऊंटंट अकाऊंट आणि फर्मची खोटे ओव्हर सर्टफिकिट बनवून त्यावर खोटी सही व शिक्का घेणाऱ्या दोन जणांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र सानप आणि रोहिदास भेरले अशा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या ऑनलाईन निविदा नुकत्याच निघाल्या होत्या. त्या निविदा भरण्यासाठी महेंद्र आणि रोहिदास यांनी संगनमत करून चार्टड अकाऊंटंट मेहराज शेख यांच्या फर्मचे बनावट टर्न ओव्हरचे सर्टफिकीट बनवले. त्यावर मेहराज यांची खोटी सही व बनावट शिक्का वापरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या जंतूनाशक फवारणीचे कंत्राट मिळण्याकरिता वापर केला. ही बाब चार्टड अकाऊंटंट मेहराज यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन महेंद्र आणि रोहिदास यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.