ठाणे : ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी-काल्हेर रस्त्याची दुरावस्था झाली असतानाच, या मार्गावरील कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याची दिसून येत आहे. या ढिगाऱ्यांमधील माती व रेती रस्त्यावर इतरत्र पसरून त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. या शिवाय, माती आणि रेतीच्या ढिगाऱ्यांना वाहन धडकूनही अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी रस्त्याच्या पुढच्या टप्प्याला मंजुरी

ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजुरफाटा या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांसह इतर वाहनांची सतत वर्दळ सुरु असलेल्या या मार्गावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. याठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरणीसाठी काही ठिकाणी डांबर टाकण्यात आले आहेच. परंतु काही खड्डे भरले आहेत तर, काही ठिकाणी खड्डे भरलेले नसल्याचे दिसून येते. यामु‌ळे वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> हत्या करून गुप्तांग कापून तोंडात कोंबले…भिवंडीतील धक्कादायक प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, या रस्त्यावर मातीचा धुराळा उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भिती व्यक्त असून अनेक नागरिक या मार्गावरून प्रवास करताना मुखपट्टीचा वापर करीत आहेत.  असे असतानाच या रस्त्यावरील कशेळी खाडी पुलावर मातीचे ढिगारे साचल्याची दिसून येत आहे. या खाडी पुलावर काही वर्षांपुर्वी एक वाहिनी टाकण्यात आली होती. त्यासाठी पुलाच्या कठड्याजवळ गर्डर टाकण्यात आले होते. या गर्डरमधून वाहीनी टाकून त्यावर रेती व मातीचा भराव टाकण्यात आला होता. हि वाहीनी काही दिवसांपुर्वीच हटविण्यात आली आहे. या वाहीनीसाठी टाकण्यात आलेले गर्डरही हटविण्यात आले आहेत. त्यातील रेती आणि मातीचा भरावाचे ढिग मात्र पुलाच्या कठड्याजवळ तसेच आहेत. या ढिगाऱ्यातील माती आणि रेती रस्त्यावर इतरत्र पसरत आहे. त्यावरून दुचाकी घसरुन अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच मातीच्या ढिगाऱ्यांना वाहन धडकूनही अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हे ढिगारे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.