डोंबिवली – कोपर पश्चिमेतून कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा चाळी, इमारतींना चोरट्या मार्गाने आणलेल्या जलवाहिन्या पालिकेच्या ग प्रभाग कायार्लयाने शुक्रवारी तोडून टाकल्या. अचानक झालेल्या या कारवाईने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. या चोरीच्या पाणी वापरातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नसल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले.

‘लोकसत्ता’ने गेल्या सप्ताहात कोपर पश्चिम भागातून रेल्वे रुळाखालून नाला, गवत, झुडपांचा आधार घेऊन कोपर पूर्व रेल्वे स्थानक, आयरे भागात चोरीच्या नळजोडण्या आणल्या आहेत. या नळ जोडण्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून आणल्या आहेत, असे वृत्त दिले होते. या वृत्ताने रेल्वे आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले होते. पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या पाणी चोरी प्रकरणाची तातडीने चौकशी करून चोरीच्या जलवाहिन्या तोडण्याचे आदेश परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे, साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त साबळे यांनी अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, उपअभियंता विनय रणशूर आणि कारवाई पथकाला सोबत घेऊन कोपर पूर्व-पश्चिम रेल्वे भागात पाहणी केली. त्यांना कोपर पश्चिम भागातून नाल्यातून रेल्वे रुळाखालून झाडाझुडपांचा आधार घेऊन २८ मिलिमीटर व्यासाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या पूर्व भागात आणल्याचे आढळले.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

हेही वाचा – डोंबिवलीत साईबाबा मंदिर ते मानपाडा रस्ता सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद

साबळे यांच्या आदेशावरून कारवाई पथकाने तातडीने मुख्य जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करून चोरीच्या प्लाॅस्टिकच्या वाहिन्या करवती, धारदार पातीच्या साहाय्याने कापून टाकल्या. तोडलेल्या सर्व वाहिन्या जप्त करण्यात आल्या. कारवाई सुरू असताना एकही रहिवासी, भूमाफिया कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. ७८ हून अधिक चोरीच्या नळ जोडण्या कोपर पूर्व भागात तोडण्यात आल्या. उर्वरित जलवाहिन्या शोधून त्याही तोडण्यात येणार आहेत, असे साहाय्यक आयुक्त साबळे यांनी सांगितले.

एका लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या जलवाहिन्या टाकण्यात आल्याची चर्चा या भागात आहे. कारवाईनंतर एका लोकप्रतिनिधीने कारवाई का केली, म्हणून थयथयाट केला असल्याचे समजते. पालिकेकडून गुन्हा दाखल होईल. विधानसभा किंवा पालिका निवडणूक लढविता येणार नाही या भीतीने या लोकप्रतिनिधीने शांत राहणे पसंत केले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. कोपर पश्चिमेतून पूर्व भागात पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून चोरून २५० हून अधिक जलवाहिन्या आणण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, स्थानक अधिकारी, बांधकाम अधिकारी याविषयी मौन बाळगून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – कल्याण मध्ये शिवाजी चौकात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रेल्वेचे पत्र

रेल्वेच्या एका स्थानिक अधिकाऱ्याने रेल्वे रुळाखालून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांसंदर्भात वरिष्ठांना पत्र लिहिले आहे. रुळाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या काढून टाकण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

“कोपर पूर्व रेल्वे परिसर, आयरे भागात बेकायदा चाळी, इमारतींसाठी घेण्यात आलेल्या चोरीच्या ७८ हून अधिक जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. गवत झुडपांचा आधार घेऊन चोरून टाकण्यात आलेल्या सर्व जलवाहिन्या शोधून त्या तोडण्याची कारवाई सुरूच ठेवणार आहोत.” असे डोंबिवली ग प्रभाग सहाय्यक आयुक्त संजय साबळे म्हणाले.