scorecardresearch

कल्याण मध्ये शिवाजी चौकात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एक वाहन चालक तेथून जात असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनाची जोरदार धडक पादचाऱ्याला बसली.

dead
बहिणीला भेटण्याची इच्छा अपूर्णच… मध्यप्रदेशहून आलेल्या भावाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू ( Image – लोकसत्ता टीम )

कल्याण- येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री एका वाहनाने दिलेल्या धडकेत या भागातून पायी चाललेल्या एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. शिवाजी चौकातील इमेज शोरुम दुकाना समोरुन शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता एक पादचारी पायी चालला होता. त्यावेळी भरधाव वेगाने एक वाहन चालक तेथून जात असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे वाहनाची जोरदार धडक पादचाऱ्याला बसली.

हेही वाचा >>> ठाणे : अपघातात दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू

त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. तोपर्यंत वाहन चालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने हवालदार मयूर तरे यांच्या तक्रारीवरून चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 15:54 IST