खरेदी हा महिलांसाठी अत्यंत आवडीचा विषय आहे. त्यामुळे महिलांनी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला दिलेला प्रतिसाद स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, या खरेदीसोबत बक्षीस जिंकण्याची संधी मिळत असेल तर ही आनंदाची पर्वणी आहे, असे मत अभिनेत्री प्रिया मराठे हिने केले.
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरणाचे दुसरे पुष्प शनिवारी सायंकाळी ठाणे स्थानक परिसरातील वामन हरी पेठे सन्सच्या शोरूममध्ये पार पडले. ‘तू तिथे मी’, ‘जयोस्तुते’ अशा मालिकांमधून कसदार अभिनय करणाऱ्या प्रिया मराठे हिच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना या वेळी मिळाली. यावेळी २६ ते २८ जानेवारी दरम्यानच्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. बक्षीस मिळाल्याच्या आनंदासोबतच प्रिया मराठे हिला जवळून पाहण्याची, तिच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाल्याने ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. लोकसत्ताने राबवलेल्या या उपक्रमाचे प्रियानेही कौतुक केले. तसेच यानिमित्ताने चाहत्यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले.  
‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी शोरूम्समध्ये खरेदी केल्यानंतर प्रत्येक खरेदीवर बक्षीस जिंकण्याची अभिनव योजना या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना मिळाली आहे. पैठणी, सुवर्णमुद्रा, मोबाइल, गिफ्ट व्हाऊचर, गिफ्ट हॅम्पर अशा वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसे ग्राहकांना या निमित्ताने ग्राहकांना मिळत आहे.              

‘लोकसत्ता’ २० वर्षांपासून वाचत असून यामुळे ज्ञानामध्ये चांगली भर पडत असते. अशा वर्तमानपत्राने आम्हाला बक्षीस मिळवून देण्याची अनोखी संधी दिली. बक्षीस मिळाल्याची माहिती सांगितल्यानंतर इतरांनीही पुढच्या वेळी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र खरेदीला जाणार आहोत.
– सविता कानवडे, पारितोषिक विजेते
साहिल कानवडे यांच्या आई

दर्जेदार फेस्टिव्हल..
‘लोकसत्ता’ने आयोजित केलेला हा महोत्सव अत्यंत दर्जेदार असून शहरातील नामवंत शोरुम्समध्ये हा महोत्सव सुरू आहे. ग्राहकांना दुकानापर्यंत आणण्यासाठी लोकसत्ता या उत्सवाच्या माध्यमातून महत्त्वाचे काम करत आहे. अशा स्पर्धा नेहमीच विविध ठिकाणी होतात. मला प्रथमच असे पारितोषिक मिळत असल्याचा खूप आनंद होत आहे.
– मंजुषा शेलार,पारितोषिक विजेत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.