मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बोईसर जवळील चिल्हार फाटा जवळ पालघर पोलीसानी गावठी बनावटीचे तीन एके-47 अग्निशस्त्र, चार गावठी बनावटीचे पिस्तूल व रिव्हॉल्व्हर , 63 जिवंत काडतुसे व अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून प्रतिबंध असलेल्या शस्त्र विक्रीच्या या प्रकारांमध्ये मोठी टोळी सक्रीय असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मनोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पालघरची स्थानिक गुन्हे शाखा ही संयुक्त कारवाई करण्यात आली. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी चिल्लार फाट्याजवळील शस्त्र विक्री करणारे मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसनी सापळा रचला एका धाब्यावर बसलेल्या दोन संशयित इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन प्लास्टिकच्या गोणीमध्ये अग्निशस्त्र तसेच आठ किलो 900 ग्राम ईफ्रेदिन, साडेआठ किलो डी.एम.टी तसेच ब्राऊन शुगर व डोडो मार्फिन नावांचे अमली पदार्थ सापडले. अग्निशस्त्र अमली पदार्थ व जिवंत काडतूस यांची अंदाजे किंमत 13.61 कोटी रुपये इतके असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हा सर्व प्रकार गावठी बनावटीच्या शस्त्र विकण्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या प्रकाराची तपासणी सुरू असून दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात शस्त्र खरेदी- विक्री करणाऱ्या मोठे रॅकेट व टोळी उघडकीस येण्याची शक्यता असल्याने याप्रकरणाची सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.