ठाण्यातील हजारो मॅरेथॉनप्रेमींनी रविवारी झालेल्या हिरानंदानी अर्ध-मॅरेथॉनमध्ये उत्साही सहभाग घेतला होता. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथून सुरू झालेल्या या मॅरेथॉनच्या २१ किमीच्या स्पर्धेमध्ये अनिल पवार विजेता ठरला.
हिरानंदानी कन्स्ट्रक्शन कंपनीचे एमडी नीरज हिरानंदानी यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या मॅरेथॉनच्या प्रवेश शुल्कातून मिळालेला निधी कॅन्सर रुग्णांसाठी देण्यात आल्याचे, हिरानंदानी यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि महापौर संजय मोरे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2015 रोजी प्रकाशित
अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत अनिल पवार विजेता
ठाण्यातील हजारो मॅरेथॉनप्रेमींनी रविवारी झालेल्या हिरानंदानी अर्ध-मॅरेथॉनमध्ये उत्साही सहभाग घेतला होता.

First published on: 16-02-2015 at 04:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil pawar win hiranandani half marathon