sahaj-safarफुलपाखरू छान किती दिसते..’ या काव्यपंक्ती माहीत नसतील असा मराठी माणूस विरळाच. रंगबेरंगी फुलपाखरू साऱ्यांनाच आवडते. अगदी लहानग्यांपासून आबालवृद्धांना फुलपाखरांचे आकर्षण असते. बागेत भिरभिरणाऱ्या फुलपाखराच्या मागे धावणे हा तर सर्वच लहान मुलांचा आवडता छंद. लहानच काय तर मोठय़ांनाही या रंगीबेरंगी, आकर्षक फुलपाखरांचे निरीक्षण करायला आवडते. फुलपाखराची ही आवड लक्षात घेऊन डोंबिवलीतील रोटरी क्लबने एक ‘फुलपाखरू उद्यान’ साकारले आहे. फुलपाखराची आवड असणाऱ्यांना, त्याशिवाय अभ्यासकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
डोंबिवली पूर्वेत पेंढरकर महाविद्यालयाच्या समोर रोटरी भवनच्या आवारात हे फुलपाखरू उद्यान विकसित करण्यात आले आहे. फुलपाखरांना येथे मुक्त वावर करता यावा अशीच रचना या उद्यानाची करण्यात आली आहे. फुलपाखरांना कोणत्या प्रकारची झाडे, वनस्पती आवश्यक आहे, याचा विचार करून या वनस्पतींची लागवड येथे करण्यात आली आहे.  इक्झोरा, लॅन्टेना (घानेरी), tvvish16अशोका, रुई, जमैकन स्पाइक, कढिपत्ता आदी वनस्पती या उद्यानात लावण्यात आल्या आहेत. यापैकी काही फुलझाडे असल्याने फुलपाखरे येथे आकर्षित होतात. त्यामुळे विविध प्रजातींची, विविध रंगांची आकर्षक फुलपाखरे या उद्यानात पाहायला मिळतात. फुलपाखरांचे प्रजनन, पोषण योग्य प्रकारे व्हावे हा विचार करूनच या वनस्पतींची येथे लागवड करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत फुलपाखरू, त्याचा जीवनक्रम आदी माहिती शिकविली जाते. मात्र त्यांना प्रत्यक्षात याचा अभ्यास करायचा असेल, तर हे उद्यान एक पर्वणीच आहे. शालेय विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह येथे फुलपाखरांविषयी प्रात्यक्षिक माहिती घेऊ शकतात. त्याशिवाय फुलपाखरांचे अभ्यासकही येथे येऊन विविध प्रकारच्या, प्रजातींच्या फुलपाखरांचा अभ्यास करू शकतात, त्याशिवाय अरण्य छायाचित्रांची आवड असणारे छायाचित्रकारही येथे फुलपाखरांचे वा येथील वनस्पतींचे छायाचित्रण करण्यासाठी येऊ शकतात.
आकर्षक आणि सुंदर असल्याने फुलपाखरू कवींचेही आकर्षण असतेच. बहुतेक साऱ्या भाषेत फुलपाखरांना शब्दबद्ध करण्यात आले आहे. यातीलच काही निवडक कविता वेचून त्याचे फलक या उद्यानात लावण्यात आले आहेत. ग. ह. पाटील यांची ‘फुलपाखरू छान किती दिसते’, डॉ. परशूराम शुक्ल यांची  ‘रंगीबेरंगी प्यारी तितली’ या कवितांसह विल्यम वर्डस्वर्थ यांची ‘आय हॅव वॉच बटरफ्लाय’ आणि हेर्दर बर्न्‍स ‘कम माय बटरफ्लाय’ या इंग्रजी कवितांचे फलक या उद्यानात लावण्यात आले आहेत. त्याशिवाय फुलपाखरांसंबंधित उपयुक्त माहितीही येथे देण्यात आली आहे. फुलपाखराचे जीवनक्रम कसे असते, त्याचे पोषण, प्रजनन, जगात व भारतात फुलपाखरांच्या प्रजाती किती आहेत, जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान फुलपाखरू कोणते आदी माहितीही या उद्यानात फलकाद्वारे लावण्यात आली आहे. या उद्यानाच्या मागे असलेल्या भिंतीवर विविधरंगी फुलपाखरांची, त्याशिवाय त्यांच्या जीवनक्रमासंबंधित चित्रे काढण्यात आलेली आहेत.
संदीप नलावडे

फुलपाखरू उद्यान
* कुठे : पेंढरकर महाविद्यालयासमोर, एमआयडीसी, डोंबिवली (पूर्व)
* कसे जाल? : डोंबिवली स्थानकापासून पेंढरकर महाविद्यालयाकडे केडीएमसीच्या बस, त्याशिवाय रिक्षानेही जाता येते.
* कल्याण स्थानकाजवळून नवी मुंबई, बेलापूरला जाणाऱ्या बस विको नाका येथे थांबतात. तेथून काही अंतरावरच उद्यान आहे.
* काय पाहाल? : विविधरंगी, आकर्षक फुलपाखरे, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलपाखरासंबंधित कविता, उपयुक्त माहिती आणि चित्रे.
* वेळ : संध्याकाळी ४ ते ८

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…