tvlog03लोकलगाडीने ठाण्याच्या दिशेने जाताना मुंब्रा स्थानकाजवळ उंच डोंगराच्या मध्यभागी एक मंदिर दिसते. डोंगरात कोरलेल्या या नयनरम्य मंदिरावर लोकलमध्ये चर्चा रंगतात, तिथे जावे आणि देवदर्शन घ्यावे, अशी इच्छा अनेकांच्या मनात निर्माण होते.. केवळ देवदर्शनासाठीच नाही, तर वरून सभोवतालच्या निसर्गसौंदर्याचे दृश्य किती अप्रतिम दिसेल, असा विचारही मनात येतो आणि अनेक तरुण मंडळी या वीकेण्डला या मंदिराची सफर करण्याचा बेत लोकलमध्येच आखतात.. मुंब्य्राच्या या मंदिराबाबत सर्वानाच आकर्षण वाटते. तिथे जाण्याची आणि देवदर्शन करण्याची इच्छा लोकलमधील बहुतेक प्रवाशांची असते.
मुंब्रा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडले की या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. स्थानकाबाहेरील जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडला की एक गल्ली या डोंगरावर जाते. या गल्लीतून थोडे पुढे गेल्यास डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्याच आपल्याला थेट मुंब्रादेवीच्या मंदिराकडे घेऊन जातात. या पायऱ्या चढताना थकायला होते, पण वर चढल्यानंतर डोंगरावरून सभोवातालचे निसर्गरम्य आणि नयनरम्य दृश्य पाहिल्यानंतर थकवा कुठच्या कुठे पळून जातो.
मुंब्य्राच्या या डोंगरावरून ठाण्याच्या खाडीचे अप्रतिम दृश्य दिसते. अगदी खाडीपल्याडची काही गावेही दिसतात आणि मन सुखावून जाते. मध्य रेल्वेचा मार्ग अगदी स्पष्ट दिसतो. धीम्या आणि जलद मार्गावरून गाडय़ा येत असतील, तर रेल्वेचे हे दृश्य पाहण्यास एक वेगळीच मजा येते. दिवा-मुंब्रा परिसरात लोहमार्गाचे जाळे कसे पसरले आहे याची माहिती या डोंगरावर गेल्यावर कळते.
डोंगरावर देवीचे छोटेसे मंदिर आहे. मुंब्रा म्हणजे नवदुर्गा. या मंदिरात नऊ देवींची मूर्ती आहे. दगडात या नऊ मूर्ती कोरलेल्या असून, त्यावर शेंदूर फासलेला आहे. नवरात्रीत या मंदिरात भाविकांची गर्दी असते, तसेच अनेक ट्रेकर मंडळीही हा डोंगर सर करण्यासाठी या भागाला भेट देतात. हे मंदिर जरी डोंगराच्या मध्यावर असले तरी ट्रेकर्स मंडळींना थेट माथ्यावर जायचे असते. पायऱ्यांनी या मंदिरापर्यंत येऊन नंतर ट्रेकर्स विविध मार्गानी हा डोंगर सर करतात. पावसाळ्यात येथे छोट-छोटे धबधबे निर्माण होत असल्याने भोवतालचा परिसर खूपच निसर्गसुंदर दिसतो. पावसाळ्यात बरीच माकडेही या परिसरात येत असल्याने त्यांच्या मर्कटलीला पाहात डोंगर चढण्यास वेगळी मजा असते.

मुंब्रा मंदिर, मुंब्रा
कसे जाल?
* मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकावर उतरावे. तेथून मुंब्रा मंदिराकडे जाण्याचा मार्ग विचारल्यास कुणीही सांगेल.
ठाणे, पनवेल, वाशी, ठाणे येथून मुंब्य्राला जाणाऱ्या बस सुटतात. या बस अगदी या डोंगराच्या पायथ्याशी येऊन तुम्हाला सोडतील.
* खासगी वाहन असेल, तर शिळफाटा येथून मुंब्य्राकडे यावे.
संदीप नलावडे

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना