scorecardresearch

ठाणे: साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही पदाधिकाऱ्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Assistant Commissioner Mahesh Aher assault case
साहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरण; अटकेतील चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही पदाधिकाऱ्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. या मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>>मुख्यमंत्र्यांच्या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणखी एक उड्डाणपूल

या प्रकरणात पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशंत गायकवाड या चौघांना अटक केली होती. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आव्हाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे. सोमवारी अभिजीत, विक्रम, हेमंतर आणि विशंत या चौघांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 13:53 IST
ताज्या बातम्या