राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबत संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः आव्हाड यांनी सांगितले. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे.

“सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. माझ्या मुलीला शूटर लावून शूट करुन टाकायचं. जावयाला देखील त्याच्या घराजवळ मारायचं किंवा त्याला भीती बसेल असे काहीतरी करायचं, याबद्दल बोललं गेलं आहे. मी बाबाजींच्या जीवावर काम करत आलो आहे”, असेही ती व्यक्ती बोलत आहे. “मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. कारण तक्रार दाखल करुनही काही होत नाही. फक्त चौकशीच्या नावांवर पोलीस काहीही करत नाही आणि आरोपी आपल्यासमोर फिरत असतो. मग तक्रार दाखल करुन तरी काय होणार?”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

हे वाचा >> ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला

या प्रकरणाची शंभर टक्के चौकशी होणार – फडणवीस

राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमक आल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणाची १०० टक्के चौकशी केली जाईल. जितेंद्र आव्हाड किंवा कोणी नेता असेल त्यांना संरक्षण देऊन कोणत्याही प्रकाराचा आघात होऊ नये. ही सरकारची जबाबदारी असून ती जबाबदारी चोखपणे पार पाडली जाईल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.