‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने नौपाडा येथे रक्तदान शिबीर

नौपाडा भागातील कै. वामनराव ओक रक्तपेढीच्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त १४ फेब्रुवारीला युवक आणि युवतींसाठी घंटाळी चौकात रक्तदान शिबीर होणार आहे.

नौपाडा भागातील कै. वामनराव ओक रक्तपेढीच्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त १४ फेब्रुवारीला युवक आणि युवतींसाठी घंटाळी चौकात रक्तदान शिबीर होणार आहे. ‘क्षण प्रेमाचा जिवलगासाठी, थेंब रक्ताचा सर्वासाठी’ या संकल्पनेवर आधारित हा सामाजिक उपक्रम असेल. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी ५.३० ते रात्री ७.३० या वेळेत रक्तगट ओळख, रक्तगट आणि प्लेटलेट सूचीची नोंदणी होणार असल्याची माहिती रक्तपेढीचे कार्यवाह अतुल धर्मे यांनी दिली. या दिवशी तरुण-तरुणींनी रक्तदानासारखे अमूल्य कार्य करावे, हा या कार्यक्रमामगचा उद्देश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blood donation camp at naupada on the occasion of valentine day