‘साहित्य आणि संस्कृतीचे ठाणे’, अशी ओळख निर्माण होण्यासाठी ठाणे शहरातील वाचनालय आणि ग्रंथालयांचा खूप मोठा सहभाग राहिला आहे. या साहित्य संस्कृती जपणाऱ्या मंदिराचा उत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ‘ग्रंथोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव तलावपाळीसमोरील शिवाजी मैदान येथे होणार आहे.
* शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
* जेष्ठ पत्रकार व लेखक अरुण साधू आणि संभाजी घरत यांची मुलाखत कवियत्री अनुपमा उजगरे, कवी डॉ. महेश केळुस्कर आणि अरुण म्हात्रे घेणार आहेत.
* शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता  ‘सोशल मीडिया साहित्यावर मात करीत आहे का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मान्यवर सहभागी होणार आहेत.
* संध्याकाळी ७ वाजता ‘साहित्याचा सिनेमा आणि नाटकावरील प्रभाव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक सुधीर नांदगावकर, निर्माते दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे, अभिजीत पानसे, अभिनेते चिन्मय मांडलेकर, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आदी मान्यावर सहभागी होणार आहेत.
* रविवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता कवी संमेलन होणार असून त्याच दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये  प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मल्लिका अमरशेख, निळकंठ कदम, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.