ठाण्यात कोंबडी विक्रेत्यांकडून शुल्क आकारण्याचा पालिकेचा विचार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरात जनावरे तसेच बोकडाचे मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ज्याप्रमाणे शुल्क आकारले जाते, त्याच धर्तीवर शहरातील कोंबडी विक्रेत्यांकडूनही शुल्क वसूल करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेने शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली असून या मागणीच्या आधारे प्रशासनाने त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची तयारी दाखविली आहे. या प्रस्तावामुळे ठाण्यातील चिकन महागण्याची चिन्हे आहेत. मात्र हे शुल्क नेमके किती असेल, हे प्रत्यक्ष प्रस्ताव सादर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chicken prices will shoot up in thane
First published on: 23-05-2017 at 04:09 IST