डोंबिवली: बालवयापासून मुलांमधील सुदृढता वाढीस लागावी. पालकांमध्ये याविषयी जागृती असावी या उद्देशातून डोंबिवलीतील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेच्या स. वा. जोशी विद्यासंकुलात रोटरी क्लब डोंबिवली मिडाटाऊनतर्फे सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.

आरोग्याचे आणि स्पर्धेतील सर्व निकष पालन करणाऱ्या गुटगुटीत बालकांना यावेळी त्यांच्या पालकांसह सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी बालकांची तपासणी ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डाॅ. गिरीश भिरुड यांच्या नेतृत्वाखाली नामवंत बालरोग तज्ज्ञांनी केली. बालकांच्या आरोग्य तपासणीतील निकषांवर बालकांची सुदृढ बालक म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा >>> डोंबिवली: वैज्ञानिक शोधांमध्ये पैशापेक्षा गुणवत्ता हेच अधिष्ठान, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी डाॅ. कोल्हटकर यांनी सुदृढ बालक कोण, त्याचे आरोग्य कसे असावे. बाळाचा दैनंदिन आहार आणि त्याची सुदृढता याविषयीची दहा सुत्री सांगितली. रोटरी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुदृढ बालक आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत बालक- वयोगट-सहा महिने ते एक वर्ष-प्रथम-अवनी जोशी, व्दितीय सिया चौधरी, तृतीय हदय चौधरी, उत्तेजनार्थ साची गोठी. वयोगट एक ते तीन- प्रिशा भगत, हेरंब देशमुख, आयांश केरकर, चिरंतन जोशी, वयोगट तीन ते पाच वर्ष – यशवी वाघुळदे, आर्या भट, भक्ती कोयंदे, विराजस, रेडीज.