डोंबिवली – सोमवारी रात्री होळीचा आनंद साजरा करत असताना डोंबिवली जवळील आजदे गाव येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

आजदे पाडा येथे सार्वजनिक होळी पेटवल्यानंतर उपस्थित तरुण रंग, पाण्याचे फुगे एकमेकांवर फेकून आनंदोत्सव साजरा करत होते. बोंब ठोकून आनंद लुटला जात होता. ही मौजमजा सुरू असताना एका तरुणाने आपल्या लगतच्या तरुणाच्या अंगावर पाण्याचा फुगा फेकला. त्याचा राग दुसऱ्या गटातील तरुणाला आला. त्याने पाण्याचा फुगा का फेकून मारलास, असा प्रश्न फेकणाऱ्या तरुणाला केला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

हेही वाचा – मुंबई, डोंबिवलीत ३७ घरफोड्या करणारे दोन सराईत चोरटे मुंब्रा मधून अटक

हेही वाचा – कल्याणमधील धर्मसभेत मलंगगड मुक्तीचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरुणांच्या हाणामारीमुळे त्यांचे समर्थक पुढे आले. दोन गट तेथे तयार झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. वाद मिटत असताना एका तरुणाने लाकडी काठी प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने फेकली. जाणकारांनी पुढाकार घेऊन वाद मिटविला. होळी खेळण्यासाठी आलेले इतर तरुण, महिला, तरुणी या प्रकरानंतर तेथून निघून गेल्या.