tanga04 tanga01 tanga02 tanga03१८५४मध्ये कल्याण शहरात पहिल्यांदा आगगाडी धावली आणि कल्याण शहर मुंबईशी जोडले गेले. त्याकाळातही मुंबईमध्ये कामावर जाणाऱ्या कर्मचारी संख्या मोठी होती. या कर्मचाऱ्यांना घराकडे पोहचवण्यासाठी शहरात टांगे वाहतूक सुरू झाली. कल्याणमध्ये उतरलेल्या प्रवाशांना टिटवाळा, अंबरनाथ आणि भिवंडीमध्येही पोहचवण्याचे काम हे टांगे करत होते. कल्याणचे मोहम्मद फाळके यांनी त्या काळात टांगा वाहतूक व्यवसाय सुरू केला. आज त्यांची पुढची पिढी हा व्यवसाय करत आहे. शहरातील वाहतुकीसाठीच नव्हे तर सण-उत्सव आणि लग्नसमारंभानांही टांग्याचा उपयोग व्हावा यासाठी फाळके कुटूंबीय प्रयत्न
करत आहेत.
दीपक जोशी