शिंदेच्या सेनेतील माजी नगरसेवक अस्वस्थ…

corruption allegations post facebook against shinde shiv sena ex corporator in thane ठाणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाविरोधात समाज माध्यामांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून समाज माध्यामांवरील संदेशातील मजकुरामुळे हा नगरसेवक शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. या संदेशात माजी नगरसेवकाचे थेट नाव घेतले जात नसून जेठालाल असा उल्लेख करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, दिवंगत भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंटवरून हे संदेश प्रसारित होत असल्याने शिंदेच्या सेनेतील माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. यातूनच काही दिवसांपुर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक अमित सरैय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत शिंदेच्या माजी नगरसेवकाविरोधात दंड थोपटले आहेत. असे असले तरी यानिमित्ताने वागळे इस्टेटमधील जेठालाल कोण ? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडुण येतात. शिवसेनेतील फुटीनंतर येथील नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले.

वागळे इस्टेट भागातूनच शिंदे हे निवडुण आले आहेत. याच परिसरातील त्यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकाविरोधात गेल्या कागी दिवसांपासून समाजमाध्यामांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. विशेष म्हणजे, दिवंगत भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंटवरून हे संदेश प्रसारित होत आहेत. यामुळे या प्रकरणामुळे शिंदेचे नगरसेवक अस्वस्थ आहेत.

भ्रष्टाचाराचे आरोप ?

दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून शिंदे गटातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाविरोधात संदेश अद्याप थांबलेले नाहीत. या उलट संदेश आणखी वाढले असून त्यात माजी नगरसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. “अरे जेठालाल साहेब, ढाई वर्षात काय जादूचा डबा उघडलाय राव? मुरबाडात शेकडो एकर जमीन, वर्तक नगरात ६ कोटींचा बंगला, ६० लाखाची फॉर्च्यूनर, दोन ३०-३० लाखाच्या इनोव्हा, ओमेगा मध्ये चकाचक ऑफिस, अशर १६ मध्ये दोन भलमोठे फ्लॅट साहेब, हा खजिना कुठून पडला रे? कोणता अलादीनचा दिवा मिळाला, की थेट बाबाजींची कृपा झाली?” असे संदेशात आरोप केले जात आहेत.

सेना विरुद्ध भाजप वाद रंगला

दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून शिंदे गटातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर सातत्याने टीका केली जात होती. यातूनच शिंदेची सेना विरुद्ध भाजप वाद रंगला आहे. या प्रकरणी शिंदेच्या माजी नगरसेवकाने एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे चंद्रेश यादव या तरुणाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

मात्र, यादवची चौकशी सुरू असतानाच विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून आणखी एक संदेश प्रसारित झाला. यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. असे असले तरी त्याला जेव्हा पोलिसांनी पकडून नेले, त्यावेळी तिथे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. याच दरम्यान, अमित सरैय्या पोलीस ठाण्यात पोहोचले आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या मागणीमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सरैय्या यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत शिंदेच्या माजी नगरसेवकाविरोधात दंड थोपटले आहेत.

जेठालाल कोण ?

दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून प्रसारित होणाऱ्या संदेशात माजी नगरसेवकाचे थेट नाव घेतले जात नसून जेठालाल असा उल्लेख करण्यात येत आहे. प्रत्येक संदेशात जेठालाल असाच उल्लेख केला जात आहे. तसेच समाज माध्यामांवरील संदेशातील मजकुरामुळे हा नगरसेवक शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे वागळे इस्टेटमधील नाक्यानाक्यावर जेठालालची चर्चा सुरू असून वागळे इस्टेटमधील जेठालाल कोण ? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.