चरई भागात राहणाऱ्या केसर दामजी सत्रा (५५) यांचे अनुक्रमे ६५ हजार आणि ३० हजार रुपये किमतीची दोन मंगळसूत्रे गुरुवारी नौपाडा येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरटय़ांनी खेचून चोरली. दुसऱ्या एका घटनेत चंदनवाडी येथे राहणाऱ्या अमिना अशोक कंरजे (५०) यांचे पाचपाखाडी भागातील परमार्थ निकेतनसमोर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरटय़ांनी ९५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले. अशाच प्रकारे वर्तकनगर भागात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. पवारनगर येथील पुष्पक इमारतीत राहणाऱ्या प्रमिला प्रल्हाद पगारे (६०) यांचे वसंतकुंज बसथांब्याजवळ मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी १८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले आणि लोकपुरम गृहसंकुलाकडे पोबारा केला. देवदया नगर येथे राहणाऱ्या निर्मला एकनाथ लाड (६४) यांची घरापासून काही अंतरावर ४० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ खेचली. याप्रकरणी नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वागळे इस्टेटमधील कारचोरी
ठाणे : वागळे इस्टेट येथील अंबिका नगर भागात राहणारे दीक्षान्त नाथाजी माने (३५) यांची पाचपाखाडी परिसरातील सेवा रस्त्यावर मोदी हुंदाई शोरूमजवळ उभी केलेली चारचाकी गाडी बुधवारी रात्री अज्ञात चोरटय़ाने चोरली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कापूरबावडीत अडीच लाखांचा ऐवज लुटला
ठाणे : रात्री अनवधानाने घराचा दरवाजा उघडा राहिल्याने चोरटय़ांनी लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना कापूरबावडी भागात घडली. पंचगिरी कंपाऊड भागात राहणाऱ्या राम मुरत चिगाणू वर्मा (५९) यांच्या घराचा दरवाजा बुधवारी रात्री उघडा राहिला. त्या दरवाजातून अज्ञात चोरटय़ांनी प्रवेश करून वर्मा यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख असा एकूण दोन लाख ६४ हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी चोरला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्होडाफोनच्या गॅलरीतून लॅपटॉप चोरी
ठाणे : गोरेगाव येथे राहणाऱ्या तेजस सतीश नाडकर्णी (३२) यांचा रविवारी मल्हार सिनेमागृहाजवळील व्होडाफोनच्या गॅलरीतून अज्ञात व्यक्तीने ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरला. लॅपटॉप चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे सीसीटीव्हीत चित्रण करण्यात आले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news from thane
First published on: 21-02-2015 at 12:03 IST